Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

धनगर आरक्षणासाठी राम शिंदे कधीच भांडले नाहीत…

जामखेड – सामान्य जनतेच्या मागणीवरून शरद पवार यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाणारा व कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा बदलू शकणारा तगडा उमेदवार दिला आहे. तुम्ही रोहित पवार यांना एकदा संधी देऊन पहा, पुन्हा तुम्ही त्यांना आयुष्यभर सोडणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने नान्नज येथे सोमवारी झालेल्या सभेत भुजबळ बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी भोसले, सूर्यकांत मोरे, विश्वनाथ राऊत, अक्षय शिंदे, सुरेश भोसले, शरद शिंदे, भानुदास बोराटे, हरिभाऊ बेलेकर, अमोल गिरमे, त्रिंबक कुमटकर, अप्पासाहेब मोहळकर, ज्योती गोलेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, दुष्काळात पाणी पोहोचवण्याची जबाबदारी मंत्र्यांची होती. मात्र, त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या बगलबच्च्यांनी पाण्याचे राजकारण व व्यावसायिकरण केले. फेडरेशन नावाच्या भुताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नागवले. शेतमालाची चोरी करत शेतकऱ्यांना लुटले. जलयुक्तचे बंधारे बांधले खरे, पण पाणी अडण्याऐवजी पाणी बंधाऱ्याखालून जाऊ लागले. रस्ते निकृष्ट, पुलांचेही कामे निकृष्ट झाले.

पालकमंत्री राम शिंदे हे अहल्यादेवींचे वंशज म्हणून सांगतात. मात्र, धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते विधिमंडळात एकदाही भांडताना दिसले नाहीत. मी भांडत असताना त्यांनी पाठिंबा दिला नाही. ते अहल्यादेवींचे वंशज असूच शकत नाही. खरे वंशज अक्षय शिंदे हे आहेत, असेही माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close