Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

‘या’ कारणामुळे सभापती राहुल झावरे यांनी दिला राजीनामा !

पारनेर :- आमदार विजय औटी यांच्याकडून माजी आमदार नंदकुमार झावरे यांचा इतिहास पुसला जात असल्याचे सांगत पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी आपल्या पदाचा मंगळवारी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे खळबळ उडाली.

पत्रकार परिषदेत झावरे यांनी जि. प. अध्यक्ष शालिनी विखे यांना दिलेल्या राजीनाम्याची प्रत दाखवत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, नंदकुमार झावरे यांचा अनुल्लेख आमच्या कुटुंबाला वेदना देणारा ठरला आहे.

झावरे यांनी माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची वेगळी ओळख निर्माण केली. पिंपळगाव जोगा प्रकल्प, काळू, ढोकी तलाव, पठार भागातील १६ गावांची पाणी योेजना, १४ विद्युत उपकेंद्रे, तसेच सुपे औद्योगिक वसाहत त्यांच्या काळात उभी राहिली. औटी त्यांच्या मुखात झावरे नसले, तरी गरिबांच्या मुखात आहेत.

नंदकुमार झावरे यांचे आमदार औटी राजकिय वारस होते. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी त्यांच्यावर प्रेम केले. आमच्या कुटंुबास झालेल्या वेदना आम्ही मंत्री राधाकृष्ण विखे व खासदार सुजय विखे यांना कळवल्या.

राजीनाम्याबाबतही त्यांना कल्पना दिल्याचे सांगून राहुल झावरे पुढे म्हणाले, नंदकुमार झावरे यांचा इतिहास खोडण्याचा प्रयत्न होत असून त्यातून अजूनही आमचे कुटुंब सावरलेले नाही. आपली पुढील राजकिय भूमिका काय असे विचारले असता माझा राजीनामा हीच राजकीय भूमिका आहे.

आमच्या वेदना समाजाला समजल्या पाहिजेत. झावरेंबाबतही असे होऊ शकते हे समाजाला कळले पाहिजे. झावरे यांना डावलले जाऊ लागल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. ज्यांच्या मुखात आमचे नाव नाही, त्यांचे नाव आमच्याही मुखात येणार नाही.

वडिलांचा आत्मसन्मान माझ्या महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उपसभापती दीपक पवार यावेळी उपस्थित होते.लवकरच स्वतः नंदकुमार झावरे हेही भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राहुल झावरे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button