Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthBreakingVidhansabha 2019

पुन्हा एकदा शिवसेनेकडून संग्राम जगताप टार्गेट

नगर : निवडणुकीला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. अशा वेळी मात्र पक्ष कार्यालायात मात्र खूप धावपळ पाहायला मिळत आहे. प्रचाराचे पॉम्पलेट वितरित करणे , रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून प्रचार करणे आणि महत्वाचे म्हणजे घरोघरी जाऊन भेटी घेणे.

अहमदनगर मतदारसंघ हा आता ‘हॉट’ बनलाय.  इथे लढत होतेय शिवसेना उपनेते अनिल राठोड आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यात. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष या दोघांसाठी हि लढत अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. 

आत्ताच्या घडीला राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला तर दोघांच्याही पारड्यात सारखीच मते जाण्याची शक्यता आहे . याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण काळे यांच्या मतांचा हि परिणाम होणार आहे . त्यामुळे अहमदनगरची निवडणूक ‘कांटे कि टक्कर’ असणार आहे. 
दोन्ही पक्षांनी त्यांनी सोशल मीडियावरून भावनिक साद घालायला सुरुवात केली आहे.

चौकाचौकात बॅनरबाजीचे राजकरण देखील सुरु आहे . राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना , वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर मनसेनेही विविध ठिकाणी बॅनर लावले आहेत. अगदी एका ठिकाणी तीन तीन पक्षांचे बॅनर लावले गेले आहेत . एकंदरीत नगरमधील राजकीय वातावरण आरोप प्रत्यारोपांनी चांगलेच ढवळून निघाले आहे .’अखंड विकास ‘ की ‘ओरिजिनल भैय्या’ यापैकी नगरची जनता काय स्वीकारणार हे सांगणे मात्र कठीण आहे. 

पुन्हा एकदा शिवसेनेकडून संग्राम जगताप यांना टार्गेट केलाय. गुंडगिरीला प्रोत्साहन देणारा नको तर गुंडगिरी संपवणारा पाहिजे असा नारा शिवसेनेने दिलाय . हा नवा मुद्दा शिवसेनेने चर्चेत आणला आहे .’डुप्लिकेट नको , ओरिजिनल पाहिजे’ हि शिवसेनेची मोहीम सध्या नगर शहर मतदारसंघात चर्चेत आहे. 

शिवसेनेने नगर शहरासाठीचे व्हिजन आणि दहशतमुक्त नगर या दोन विषयांना धरून काम सुरु केले आहे . त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतोय . ओरिजिनल भैय्यांचा शिवसेनेचा नारा ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button