शिर्डी झोपडपट्टीमुक्त करणार : मंत्री विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिर्डी :- सर्वधर्मीय अशी ओळख असलेल्या साईबाबांच्या शिर्डीचा गेल्या काही वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलला. हॉटेल व अन्य लहान-मोठ्या व्यावसायिकांना स्थैर्य प्राप्त व्हावे, यासाठी ठोस उपाययोजना करू, अशी ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

भविष्यात शिर्डी झोपडपट्टीमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संवाद कार्यक्रमात विखे बोलत होते. नगराध्यक्ष अर्चना कोते, कैलास कोते, योगीता शेळके, अनिता जगताप,

अभय शेळके, शिवाजी गोंदकर, विजय कोते, गोपीनाथ गोंदकर, शिवाजी गोंदकर, संजय शिंदे, सचिन कोते, रवींद्र गोंदकर, दत्तू कोते, दिलीप संकलेचा, सुजित गोंदकर, हरिचंद्र कोते, जगन्नाथ गोंदकर, बिलाल शेख, शब्बीर सय्यद आदी या वेळी उपस्थित होते.

विखे यांनी शिर्डीत कसा बदल होत गेला व भविष्यात विकासाचे कोणते व्हीजन असावे यावर प्रकाशझोत टाकला. शिर्डीत पुढील पन्नास वर्षांची लोकसंख्या विचारात घेत पाणी पुरवठा योजना केली.

फक्त महापालिकांसाठी असलेल्या अमृत योजनेत शिर्डीचा समावेश केला. रस्त्यांचे जाळे निर्माण केले. नागरिकांचे नुक़सान होऊ न देता रस्त्यांसाठी भूसंपादन केले.

भविष्यात शिर्डी झोपडपट्टीमुक्त करून शेती महामंडळाच्या जागेवर आदर्श पुनर्वसन करून मालकीचे घरे बांधून देण्याचा प्रयत्न आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी शेतीला देण्यासाठी ४० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

Leave a Comment