कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही…’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीरामपूर – ‘श्रीरामपुरातील आता जसे राजकारण सुरू आहे तसेच चालू राहू द्या डिस्टर्ब करु नका.. पण श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच डिस्टर्ब झालो आहे… श्रीरामपुरात कोणतं गोर्ह कोणत्या गायीला पितं हेच उमजायला तयार नाही… ‘अशा शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली. 

त्यांना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी जोरदार साथ दिल्याने सभेचा नूर बदलून गेला होता. भगतसिंग चौकात झालेल्या सभेत मुरकुटे यांनी सुरुवातीला कांबळेंना शिवसेनेत आणून मी अशी खुटी ठोकली कोणालाच काही कळेना, असा उल्लेख केला. सुजय विखे यांना उद्देशून मुरकुटे म्हणाले, मी तुमचे आजोबा पद्मभूषण विखे पा. वडील ना. राधाकृष्ण विखे आणि तुमच्याबरोबर काम करतोय, तुमच्या मुलाबरोबरही मी काम करेल, असे मुरकुटे म्हणताच मोठा हशा पिकला. 

माझ्याबरोबर आल्याने कांबळेंच्या तोंडात आता पठ्या शब्द आला आहे पाच वर्ष माझ्याबरोबर राहिल्यानंतर ते घालून उभे राहतील, असे मुरकुटे म्हणताच मोठा हशा पिकला मुरकुटे यांच्या बोलण्याचा धागा पकडत खा. सुजय विखे म्हणाले, मुरकुटेंचे मी प्रथमच चांगले भाषण ऐकले. आजपर्यंत जे बोलायचे ते ऐकण्यासारखे अजिबात नव्हते, असे म्हणताच मोठा हशा पिकला.

 ३२ वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामपुरात आता पारंपारिक विरोधक एकमेकांच्यासमोर आहेत. तुम्ही निवडणुकीनंतर ते डिस्टर्ब करू नका, असे चित्ते यांच्या भाषणातील मुद्दा पकडत सुजय विखे म्हणाले, श्रीरामपूरची परिस्थिती पहाता मीच सध्या डिस्टर्ब झालो आहे. काही उमजायला तयार नाही. पूर्वी विखे – आदिक लढाई होती, नंतर मुरकुटे – आदिक झाली, नंतर आदिक बाजूला गेले, मुरकुटे – ससाणे लढाई सुरू झाली. 

मतदार संघ आरक्षित झाल्यावर ससाणेंनी कांबळेंना पढे केले. मुरकटे दुसऱ्या बाजूला गेले. नगरपालिका निवडणुकीत आदिकांनी एंट्री केली. ज्या आदिकांना कांबळेंनी मदत केली ते आदिक आज कांबळेंच्या विरोधात गेले. 

दोन महिन्यापूर्वी ज्यांना पाडा म्हणलं ते स्टेजवर आहेत आणि ज्यांना निवडून आणलं ते आज दिसत नाहीत. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी काय बोललो आणि तीन महिन्यानंतर मी काय बोलेल हे मी स्वत:ही सांगू शकत नाही, अशी श्रीरामपूरची परिस्थिती असल्याचे सुजय विखे म्हणताच मोठा हशा पिकला.

Leave a Comment