Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtraVidhansabha 2019

नगरकर कोणता भैया विधानसभेत पाठवणार?

अहमदनगर –  शहरात राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप आणि शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांची लढत चांगलीच रंगतदार अवस्थेत आली आहे. खरतरं, या दोन्ही नेत्यांना नगरकर मोठ्या आदराने ‘भैय्या’ अशी हाक मारत असले तरी मतदानावेळी नेमकं कोणत्या ‘भैय्या’ ला पसंदी देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

नगर शहराचं राजकारण तसं जगताप, कोतकर, कळमकर यांच्याबरोबर राठोड, गांधी, आगरकर या नावाभोवती फिरताना दिसत आलं आहे. या निवडणुकीतही यातील आ. संग्राम जगताप आणि माजी आ. अनिल राठोड यांच्याभोवती राजकारणाची चक्रे फिरताना दिसत आहे. 

गेल्या पाच वर्षात आ. जगताप यांनी शहरात मोठी कामे केल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या प्रचारात त्यांचे वडील आ. जगताप यांना फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांना आहे. दुसरीकडे शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड हे देखील जनतेचे ‘ भैय्या आहेत. गेल्या २५ – ३० वर्षापासून अनिल राठोड यांचे नगकरांच्या मनात ‘भैय्या’ म्हणून आदराचे स्थान आहे.

जनतेच्या प्रश्नांची तळमळ आणि सुःख, दुखाची त्यांना जाणीव असल्याने ते नगरकरांसाठी सदैव तत्पर असतात, आता हे दोन्ही भैय्ये जनते समोर जावून मते मागत आहेत, तर, जनताही या दोन्ही भैय्यांना आम्ही तुम्हालाच मतदान करणार असे सांगून हसतमुखाने पुढे पाठवत आहेत. 

मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी ही जनता आपला ‘भैय्या’ म्हणून कुणाच्या पारड्यात मतं टाकील, हे निकालानंतरच समजणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button