विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत : विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, त्याची सुरुवात ना. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात केली आहे. विकास दिसायला वेळ लागतो, ही काही जादूची कांडी नाही की, फिरवली की झाला विकास.

ना. शिंदे या सर्वसामान्य व्यक्तीकडे ना कारखाना होता, ना शिक्षण संस्था, ना पैसा. तरीही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर मतदारसंघात विकासाची प्रक्रिया सुरू केली, ही त्यांची चूक आहे का? पण आज विरोधक हे मान्य करायला तयार नसून मतदारसंघात खोटी आश्वासने, भूलथापा देऊन येथील वातावरण कलुषित केले जात असल्याची टीका खा. सुजय विखे यांनी करत आपण ना. शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत, असा विश्वास उपस्थित जनसमुदायापुढे व्यक्त केला.

कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे उमेदवार ना. प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन केले होते. मात्र, काही कारणामुळे शहा सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. या वेळी मा. खा. दिलीप गांधी यांच्यासह अनेकांची भाषणे झाली.

ना. शिंदे पुढे म्हणाले, पवार यांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी जाताना आपल्या भाषणात सांगितले की, कर्जत -जामखेड सोपे नाही, हा मतदारसंघ कसा आहे हे २४ तारखेला समजेल, संपूर्ण कुटुंब माझ्याविरुद्ध मतदारसंघात उतरले आहे, गेली पाच वर्षे सत्तेत असताना मी प्रामाणिकपणे काम केले. विरोधकांनी पंधरा वर्षे सत्तेच्या काळात या मतदार संघासाठी काय केले, हे सांगायला पाहिजे होते.

मात्र, विरोधकांनी निवडणूक वेगळ्या वळणावर नेली आहे. येणारा काळ आपला असून, कृष्णा- भीमा -सीना स्थिरीकरणाचे काम करायचे आहे, यासाठी तुमचा प्रतिनिधी सत्तेत हवा आहे, त्यांनी आपला साखर कारखाना पळवला असून, सभासदांच्या शेअर्सचे पैसे दिले नसल्याचा आरोप करत मतदारसंघात अत्यंत चांगले वातावरण असून, मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असल्याचे मुख्यमंर्त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी आपली साथ हवी आहे. आगामी तीन दिवस माझ्यासाठी द्या, पुढची पाच वर्षे तुमच्यासाठी देईल, असे ना. शिंदे म्हणाले.

Leave a Comment