Ahmednagar NewsAhmednagar NorthBreaking

निळवंडेचे पाणी मिळेल त्या दिवशी आमदारकी सार्थकी

कोपरगाव : या मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न धसास लावण्यासाठी विरोधकांनी कितीही आडकाठी निर्माण केली, तरी न डगमगता त्याचा खंबीरपणे मुकाबला करणारच. विरोधकांनी निळवंडे पाणी योजनेत खोडा घातला; परंतु ज्या दिवशी कोेपरगावकरांना निळवंडेचे पाणी प्यायला मिळेल, तो दिवस आपली आमदारकी सार्थकी लागण्याचा असेल, असे भावोद्गार महायुतीच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी काढले.

शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील प्रचाराच्या सांगता सभेत आ. कोल्हे बोलत होत्या. प्रारंभी शहरातील महापुरूषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पुर्वी महारॅलीने त्यांनी कोपरगाव शहरातील मतदारांशी व्यक्तीगत गाठीभेटी घेत सुसंवाद साधून पुन्हा संधी द्यावी, अशी साद घातली.

याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, संजय सातभाई, रवींद्र बोरावके, सुमित कोल्हे, रेणुका कोल्हे, कलावती कोल्हे, कैलास जाधव, प्रमोद लबडे, शिवाजी ठाकरे, असलम शेख, भरत मोरे, दिपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, राजेंद्र सोनवणे, दिलीप दारूणकर, योगेश बागुल, शरद थोरात, कैलास खैरे, महायुतीचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार कोल्हे म्हणाल्या, निळवंडे- शिर्डी- कोपरगाव पाणीयोजना मंजुर करून आणली. त्यासाठी कोपरगाव नगरपालिकेला ३५ कोटींचा पुनस्र्थापना खर्च भरावा लागणार होता, तोसुद्धा मुख्यमंर्त्यांकडुन माफ करून आणला.

एव्हढं असुनही ही योजना न्यायप्रविष्ठ करून वर्षभर त्यात कोर्ट कचेऱ्याच्या खेटया मारायला लावल्या; पण हे पाणी मिळणारच. परमेश्वरही या पुण्याईच्या कामात आडकाठी आणणाऱ्यांना माफ करणार नाही.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button