दोन भैयांच्या लढतीत कोणाचं पारडं जड?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार तसेच अहमदनगर चे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यातील ही अतिटतीची लढत शेवटच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे.  

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना युती न होण्याचा फटका बसल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते संग्राम जगताप यांनी त्यांचा पराभव केला. 

मात्र मागील पाच वर्षांत आ. जगताप यांनी चांगला जम बसविला. विविध घटकांना जवळ करत त्यांनी आपला जनाधार वाढविला. आयटी पार्क उभारून तरूणांना रोजगार मिळून दिला, असले तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यांच्या हक्काच्या या मतदारसंघात त्यांची ५२ हजारांची पीछेहाट होती. 

त्यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. मतांमध्येही शिवसेना आणि भाजप अनुक्रमे एक आणि दोन क्रमांकावर आहे. असे असले तरी प्रत्येक निवडणुकीचा क्रायटेरिया वेगळा असतो. याची जाणीव शिवसेनेला ठेवावी लागेल. अन्यथा मागील वेळेप्रमाणे त्यांना पुन्हा झटका बसू शकतो.

 शिवसेनेच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेत्या नीलम गो-हे यांच्या सभा झाल्या, विशेष म्हणजे आ. जगताप यांच्या प्रचारासाठी खा. अमोल कोल्हे वगळता राष्ट्रवादीच्या एकाही ज्येष्ठ नेत्याची सभा झाली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरकडे पाठ का फिरविली. याबाबत मतदारसंघात चर्चा आहे. पंचवीस वर्षे आणि पाच वर्षे याची तुलना करण्याचे आवाहन राष्ट्रवादीकडून केले जात आहे. तर शिवसेनेने गुंडगिरीवर बोट ठेवून केडगाव येथील शिवसैनिकांच्या हत्याकांडाचा विषय पुन्हा समोर आणला आहे. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा शिवसेना प्रवेश, भाजपमधून हकालपट्टी झालेले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढणारे बसपचे उमेदवार श्रीपाद छिंदम, राष्ट्रवादीतून बाहेर पडत वंचित आघाडीची उमेदवारी घेतलेले किरण काळे आणि एमआयएमचे असिफ सुलताना किती मते घेतात, यावर नगरचा निकाल अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment