तिरुअनंतपुरम : नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला ते सहन करता येत नसेल, तर आनंद लुटा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट लिहिल्यामुळे केरळातील खासदाराची पत्नी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
काँग्रेस खासदार हिबी ईडन यांची पत्नी अॅना यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट लिहिली होती. अॅना लिंडा इडन यांनी मंगळवारी सकाळी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता.
सोबत आपले पती आणि काँग्रेस खासदार हिबी ईडन यांचा फोटो होता. त्यावर, ‘नशीब हे बलात्कारासारखं असतं, तुम्हाला जर सहन करता येत नसेल, तर त्याचा आनंद लुटा’ असं कॅप्शन अॅना यांनी या फोटोला दिलं.
अॅना यांची पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि नेटिझन्सनी त्यांना उथळ शेरेबाजीबद्दल चांगलंच सुनावलं. कोच्चीमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचून उद्भवलेल्या स्थितीची खिल्ली उडवल्याबद्दलही अॅना यांच्यावर टीका झाली आहे.
- बेसुमार वृक्षतोडीला वनविभागाचे अभय ! अधिकारी फोनच उचलत नाहीत…
- Ahmednagar News : तरुणाला मारले, पुरावा संपवण्यासाठी दगडात पुरला मृतदेह .. पोलिसांनी २४ तासात लावला छडा
- धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत ! मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खा. लोखंडेंना साथ द्या
- HDFC Bank Scheme: एचडीएफसी बँकेने चांगला परतावा देणाऱ्या ‘या’ विशेष योजनेची मुदत वाढवली; वाचा या योजनेची माहिती
- सुजय विखेंवर एकही गुन्हा नाही! ना एकही वाहन! अशी आहे सुजय विखेंची संपत्ती