BreakingLifestyle

वजन घटवायचं असेल तर आहार आणि व्यायामातील हा फरक जाणून घ्या…

ब्रिटनमध्ये हल्लीच झालेल्या एका ताज्या अध्ययनात असे आढळून आले की, न्याहारीच्या आधी व्यायाम केल्याने आरोग्याला जास्त लाभ होऊ शकतो. जेवण व व्यायामाच्या वेळेत बदल केल्याने रक्तातील साखर योग्यप्रकारे नियंत्रित केले जाऊ शकतात. त्यामुळे वजन घटविण्यात मदत मिळू शकते.

ब्रिटनमधील बाथ युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ झेवियर गोंजालेज यांनी सांगितले की, न्याहारीआधी व्यायाम करणाऱ्यांमध्ये चरबी दुप्पट वेगाने नष्ट होते. ३० लोकांवर सहा आठवडे करण्यात आलेल्या अध्ययनाच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. 

न्याहारीआधी व्यायाम करणाऱ्यांमध्ये इन्सुलिनसाठी प्रतिक्रियेमध्ये वृद्धी दिसून आली. हा फरक फक्त खाण्याच्या वेळत बदल केल्याने पाहण्यास मिळाला. 

अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी एक टार्गेटेड थेरेपी विकसित करण्यात यश मिळविले असून तिच्या मदतीने न्यूरोब्लास्टोमा नामक खतरनाक पीडीएट्रिक्स नर्व्ह कर्करोगग्रस्त मुलांवर उपचार करण्यास मदत मिळू शकेल. 

न्यूरोब्लास्टोमाग्रस्त किशोरवयीन मुलांमध्ये साधारणपणे या घातक आजाराचे लवकर निदान होत नाही. ही थेरेपी ईजेएच२ नामक एंजाइम नि्क्रिरय बनविते. हे जनुक सामान्य न्यूरॉनच्या वाढीला चालना देणाऱ्या जनुकाला रोखते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button