रोहित पवारांच्या विजयात बारामती ॲग्रोच्या टीमचा सिंहाचा वाटा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. पवार घरातील तिसऱ्या पिढीचे रोहित पवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना थेट आव्हान देत या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष खेचले होते. युतीच्या मंत्रिमंडळातील बडे प्रस्थ व मुख्यमंर्त्यांच्या अत्यंत जवळचे मंत्री म्हणून ना. शिंदे ओळखले जात होते.

मात्र, रोहित पवार यांनी गेल्या एक वर्षापासून अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध रणनीति आखली. तसेच आपल्याबद्दल ज़नतेमध्ये विश्वास निर्माण केला. हा फंडा यशस्वी ठरला व अत्यंत अटीतटीची वाटणारी लढत एकतर्फीच करून दाखवली. प्रचारात ना. शिंदे यांनी बाहेरचे पार्सल परत पाठवणार, मतदारसंघात आलेली शिकार करणार, असे वक्तव्य केले होते.

मात्र, पवार यांनी थेट जनतेत जाऊन ना. शिंदेंवर निशाणा साधत त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित करत जनतेची नाराजी अचूकपणे ओळखली व विजयश्री खेचून आणली. ही लढत अत्यंत अटीतटीची व चुरशीची होईल, असेच बोलले जात होते.

मात्र, निकालाअंती ही लढत पवारांनी एक हाती जिंकली. त्यास कर्जत -जामखेड तालुक्यातील काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांची साथ मिळाली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, प्रसार माध्यमांतून स्वच्छ छबी बिंबविण्यात आलेले यश, थेट जनतेत जाऊन मुले, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांना विविध कार्यक्रमातून उपक्रमातून दाखवलेला विश्वास सार्थकी लागला.

यामुळे पवारांनी मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसला नवसंजीवनी देत विजयश्री प्राप्त केली. रोहित पवार यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित दादा पवार, खा. सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे, छगन भुजबळ, पार्थ पवार यांनी सभा घेतल्या.

रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार व वडील राजेंद्र पवार यांनीही गावोगावी बैठका घेऊन दोन्ही तालुके पिंजून काढले. याशिवाय राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, काकासाहेब तापकीर,

किरण पाटील, गुलाबराव तनपुरे, राजेंद्र गुंड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, सभापती उमेश परहर, प्रवीण घुले, शाम कानगुडे, शंकर देशमुख, नितीन धांडे, परमविर पांडुळे, फिरोज पठाण, सचिन सोनमाळी, नगरसेविका मनीषा सोनमाळी, नासाहेब निकत, अशोकराव जायभाय, दीपक शिंदे, ॲड. सुरेश शिंदे, सुनील शेलार, ऋषिकेश धांडे,

शहाजीराजे भोसले, भास्कर भैलुमे, वसंत कांबळे, आदींसह जामखेडमधील मधुकर आबा राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, आबासाहेब गुळवे, संजय सस्ते आदींसह प्रमुख नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेऊन हा विजय मिळविला. पवार यांच्या या विजयात बारामती ॲग्रोच्या टीमचा सिंहाचा वाटा आहे.

Leave a Comment