Ahmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingVidhansabha 2019

राम शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ !

कर्जत: कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांनी अत्यंत रोमहर्षक व ऐतिहासिक विजय मिळवत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा ४३ हजार मतांनी पराभव केला.

गेली पंचवीस वर्षे येथे असलेली भाजपाची सत्ता संपुष्टात आणत पवारांनी नवीन पर्वाला सुरुवात केली. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे रोहित पवार यांनी भाजपाचे ना. शिंदे यांना पराभूत करत मोठा विजय मिळवला.

ही निवडणूक अनेक मुद्यांवर गाजली. मुख्यमंत्री फडणीवस यांनी थेट पार्सल परत पाठवणार का, असे म्हटले होते. मात्र, कर्जतकरांनी रोहित पवार यांना स्वीकारत मोठा विजय मिळवून देत ना. शिंदे यांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ आणली.

कर्जत येथील शासकीय गोदामात मतमोजणी पार पडली. यात राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. ना. शिंदे व पवार दोघेही मतमोज़णीप्रसंगी उपस्थित होते. १५ व्या फेरीदरम्यानच पवार हे २० हजार मतांनी आघाडीवर असताना ना. शिंदे यांनी मतमोजणी केंद्र सोडले. फेरीनिहाय पवार यांची आघाडी वाढतच होती.

ना. शिंदे यांना काही गटातून व कर्जत शहरातून आघाडी मिळेल, अशी आशा होती. मात्र, तिही फोल ठरली. पवार यांना एकूण १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली तर ना. शिंदे यांना अवघ्या ९२ हजार ४७७ मतांवर समाधान मानावे लागले. रोहित पवार यांनी ना. शिंदे यांचा ४३ हजार ३४७ मतांनी पराभव केला. निकाल ज़ाहीर होताच कार्यकर्त्यांनी पवार यांना डोक्यावर घेऊन एकच जल्लोष केला. या वेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button