पारनेर :- सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला.
राज्यातील निकाल पाहता मतदार जागा झाल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याचे हजारे यांनी यावेळी सांगितले.


विजय संपादन केल्यानंतर लंके यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. हजारे यांनी त्यांचे अभिनंदन करून पाण्याच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार तडीस न्या, असे बजावले.
येत्या दोन-तीन दिवसांत तालुक्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
हजारे म्हणाले, प्रमुख चार पक्षांना मतदान करताना सत्ताधारी व विरोधी पक्ष असा समतोल मतदारांनी राखला. युती व आघाडीच्या उमेदवारांना मतदान करताना सत्ताधारी व विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम मतदारांनी केले.
दरम्यान, विकासाभिमुख भूमिका घेत तालुक्याचा विकास वेगाने करण्याची ग्वाही नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांनी दिली.
गांजीभोयरे गावाच्या वतीने लंके यांचा सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांनी या वेळी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
- भारताच्या आधुनिक शस्त्रास्त्रांची ‘ही’ यादी वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल! ब्रह्मोस ते तेजस, सगळं येथे जाणून घ्या!
- फक्त भारतच नाही, ‘या’ देशांमध्येही गुंजतो ‘हर हर महादेव’चा जयघोष! जाणून घ्या परदेशातील प्रसिद्ध मंदिरं
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा पटसंख्या टिकवण्यासाठी संघर्ष, इंग्रजी शाळांकडे कल वाढल्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर
- ‘या’ अंकाचे लोक सोन्यासारखं नशिब घेऊन जन्मतात; त्यांची मैत्री म्हणजे करोडपती होण्याची संधी! जाणून घ्या त्यांचे गुण आणि स्वभाव
- अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण होण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ संघटनेचा इशारा