Maharashtra

आत्महत्येबाबत महाराष्ट्र नंबर वन !

नवी दिल्ली : २०१७ मध्ये देशभरात ८१२९ लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. यात १४८८ लोक महाराष्ट्रातील, तर ९६८ लोक हे मध्यप्रदेशातील होते, अशी माहिती मिळते. यावरून देशात महाराष्ट्रात सर्वाधिक लोक आत्महत्या करत असल्याचे समोर आले आहे. यानंतर मध्यप्रदेशचा नंबर लागतो, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमधून पुढे आली आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी)च्या २०१७ च्या रिपोर्टमध्ये मध्यप्रदेशात ७०७ महिलांनी आत्महत्या केली आहे, तर पुरुषांची संख्या २६२ इतकी आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात ९५१ महिलांनी आत्महत्या केली आहे, तर पुरुषांची संख्या ५३७ आहे. २०१६ मध्ये देखील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातच जास्त आत्महत्या केल्या होत्या. यात महाराष्ट्रातील ७६८ आणि मध्यप्रदेशातील ५६५ महिलांनी स्वत:चे जीवन संपवून घेतले होते.

वर्ष २०१७ मध्यप्रदेशातील ५९ लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले; परंतु समजूत काढून त्यांचे जीव वाचवले होते. एनसीआरबीनुसार, मध्यप्रदेशात असफल आत्महत्येचा दर १.२ टक्के आहे आणि देशात तिसऱ्या स्थानावर आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या करणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक आहे

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button