नवे आमदार शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून येणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार डाॅ. किरण लहामटे सध्या सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानत ते सत्कार स्वीकारत आहेत.

बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या बैठकीला ते वेळेवर उपस्थित न राहिल्याने त्यांच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

डाॅ. लहामटे दुपारनंतर मुंबईला रवाना झाले. ते सायंकाळी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले, पण तोपर्यंत नेता निवड झाली होती.

स्वतः अजित पवार यांनी आपल्या भाषणात लहामटेंचा नामोल्लेख केल्यामुळे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांची ४० वर्षांची एकहाती सत्ता उलथवून

विक्रमी मतांनी विजयी झालेले हे डाॅ. लहामटे कोण, हे जाणून घेण्याची उत्सुकता राष्ट्रवादीच्या आमदारांना व कार्यकर्त्यांना होती.

मात्र, ही संधी डाॅ. लहामटे यांनी गमावली. नंतर डाॅ. लहामटे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यास डॉ. लहामटे यांना वेळ मिळालेला नाही.

शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना नवे आमदार त्यांच्या मदतीला कधी धावून येणार आहेत, अशी विचारणा केली जात आहे.

Leave a Comment