वृत्तसंस्था :- कॉल करा आणि पैसे कमवा होय ! हे खरे खरतर कॉल केल्यानंतर तुमचे पैसे कट होतात पण टेलिकॉम सेक्टरमधील वाढत्या स्पर्धेमुळे एका कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे.
प्रत्येक टेलीकॉम वेगवेगळ्या ऑफर्स देतात. पण बीएसएनएल थेट कॅशबॅक ऑफर देत असल्यामुळे त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यूजर्सने पाच मिनिटापेक्षा अधिक जर कॉल केला तर त्याच्या अकाऊंटमध्ये 6 पैसे दिले जातील. बीएसएनएल सध्या तोट्यात सुरु आहे. त्यामुळे कंपनीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत.
“डिजिटल जमान्यात जिथे ग्राहकांना व्हॉईस आणि डाटा क्वॉलिटी सर्व्हिस पाहिजे असते. तिथे आम्ही ग्राहकांना अपग्रेडेड नेक्स्ट जनरेशन नेटवर्क देण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांना चांगला अनुभव मिळावा”, असं बीएसएनएल डायरेक्टर विवेक बंजल यांनी सांगितले.
“6 पैसे कॅशबॅक ऑफर वायरलाईन, ब्रॉडबँड आणि FTTH ग्राहकांसाठी आहे. त्यामुळे जिओचे नाराज यूजर्स बीएसएनएलकडे वळतील, बीएसएनएलच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल का, हे भविष्यात कळेल”, असंही बंजल यांनी सांगितले.
- Bank of Baroda LBO Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती! LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू
- महाभयंकर प्रलयानंतरही ‘हे’ शहर किंचितही हलणार नाही, भगवान शंकराच्या प्रिय नगरीचं रहस्य तुम्हाला थक्क करेल!
- वाहन चालकांसाठी गुड न्यूज! ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल थेट अर्ध्यावर, सरकारकडून 50% कपातीची घोषणा
- काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता
- अवघ्या 65 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, कपिल शर्माचं फिटनेस सिक्रेट उघड! जाणून घ्या 21-21-21 फॉर्म्युला