एकतर्फी प्रेमप्रकरणातून दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या विवाहितेचा खून

Published on -

सोलापूर :- विवाहितेचा एकतर्फी प्रेमप्रकरणातून गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे.

दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या प्रियंका तुकाराम गोडगे (वय २०, रा. साकत, ता. परंडा, जि. उस्मानाबाद, माहेर – न्यू लक्ष्मी चाळ, देगाव रोड, सोलापूर) ह्या विवाहितेचा खून झाला आहे

या खूनप्रकरणी माहेरच्या परिसरात राहणाऱ्या राजू श्रीकांत शंके या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रियंका गोडगे या दिवाळी सणाकरिता १५ दिवसांपूर्वीच माहेरी न्यू लक्ष्मी चाळ येथे आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी श्रेया ही देखील आली होती.

मुलीला बरे नसल्यामुळे तिला दवाखान्यामध्ये दाखवण्यासाठी प्रियंका या गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. घरातून बाहेर पडलेल्या प्रियंका यांना शंके याने यश नगर, रेल्वे लाईनजवळ नेऊन रागात येऊन एकतर्फी प्रेमातून गळा आवळून खून केला.

याबाबत प्रियंका यांचे वडील गोविंद कृष्णा चवरे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, शंके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

प्रियंका हिचे लग्न होण्यापूर्वीपासून राजू शंके हा तिला त्रास देत होता. राजू शंके हा प्रियंका हिच्या भावाचा मित्र होता. यामुळे त्याचे प्रियंकाच्या घरी येणे-जाणे होते.

प्रियंका कॉलेजला जात असताना देखील रस्त्यावर अडवून तो त्रास देत होता. या त्रासामुळे प्रियंका हिने कॉलेजला जाणे सोडून दिले होते. तरी देखील तो त्रास देत होता.

याबाबत प्रियंका हिच्या कुटुंबीयांनी राजू शंके याच्या कुटुंबीयांना सांगितले देखील होते. एका महिन्यापूर्वी देखील त्याने प्रियंका या घराबाहेर बसलेल्या असताना येऊन बोलण्याचा प्रयत्न केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!