शिर्डी :- खा. डॉ. सुजय विखे व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करून अवघे काही महिने झाले आहेत. असे असले तरी विकासाची कामे उभी करून त्यांनी जनहितासाठी नेहमीच योगदान दिले आहे. शासकीय योजना राबविण्यास नेहमीच प्राधान्य दिले.
असे असताना माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाला विखे कारणीभूत आहेत, असा आरोप काही कार्यकर्ते करीत असून वास्तविक पराभवातून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत राहाता पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, संचालक शरद मते, पंचायत समितीचे सदस्य ओमेश जपे यांनी व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, विखे यांनी अवघ्या तीन दिवसात शिवसेनेचे खा. सदाशिवराव लोखंडे यांच्याबद्दल लोकसभा मतदारसंघात मोठी नाराजी असतानाही मताधिक्य मिळवून देत विजयी केले. त्या विजयाचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे आले.
मग असे असताना विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला, यांचे आत्मचिंतन त्यांनीच करण्याची गरज आहे. कोल्हे यांच्या पराभवाला कोपरगाव तालुक्यात व शहरात असलेले खराब रस्ते, १५ दिवसांनी मिळणारे पाणी, बेरोजगारी, शासकीय योजना राबविण्यात असलेली उदासिनता, पाच नंबर तलावाला लागलेले राजकीय साठमारीचे ग्रहण अशी अनेक कारणे असतानाही त्यांना अकरा गावात चांगले मतदान झाले आहे. याचा त्यांच्या कार्यकर्त्यांना विसर पडला आहे.
ना. राधाकृ ष्ण विखे पाटील यांच्यावर निराधार करत असलेले आरोप राहाता तालुक्यातील जनता कदापिही सहन करणार नाही. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पराभवाचे खापर दुसऱ्या कोणावरही टाकून आत्मचिंतन न करता कार्यकर्ते समाधान मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतील तर हा प्रकार चुकीचा आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
- UIDAI चा नवा नियम! 3 वर्षे वापर नसेल तर आधार डिअॅक्टिवेट होईल, पुन्हा अॅक्टिव करायचं असेल तर? जाणून घ्या प्रोसेस
- भारताचे पहिले ISS अंतराळवीर शुभांशू शुक्लाची एकूण नेट वर्थ किती?, आकडा आला समोर!
- भारतातील नंबर 1 चा फ्लॉप चित्रपट, 45 कोटी खर्चून फक्त 60 हजार कमावले! ‘या’ अभिनेत्याने साकारली होती मुख्य भूमिका
- राजीव गांधी हत्या प्रकरणावर आधारित वेब सिरीजने मारली बाजी, OTT वरील टॉप 5 सिरीजची यादी!
- फक्त 1 रुपयात मिळेल इंजिनिअरिंग डिग्री, ‘या’ युनिव्हर्सिटीकडून मुलींसाठी क्रांतिकारी योजना सुरू! जाणून घ्या अधिक