पाथर्डी : मिरी -तिसगाव पाणी योजनेच्या कामात सुसुत्रता यावी, यासाठी अधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी यांनी एकत्रीत येवुन काम करण्याची गरज आहे. आता राजकारणाचा भाग सोडा आणि पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर एकत्रीत या. अवैध पाणी घेणाऱ्यांना समज देवु आणि तरीही कुणी जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम केले तर मग कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. असा इशारा आमदार प्रसाद तनपुरे यांनी दिला आहे.
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्या दालनात झालेल्या मिरी-तिसगाव योजनेच्या बैठकीत तनपुरे बोलत होते. शिवसेनचे जिल्हा परीषद सदस्य अनिल कराळे, रफिक शेख, अमोल वाघ, राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब जाधव , गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी उपस्थीत होते.

यावेळी तनपुरे म्हणाले, मिरी -तिसगाव पिण्याची पाणी योजना व वांबोरी पाईपलाईन चारी योजना या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या योजना आहेत. जनभावना महत्वाच्या असतात त्या जपल्या पाहीजेत. योजनेचे थकीत बिले, दुरुस्ती आणि नव्याने काय करता येईल यांच्यासाठी लवकरच योजनेच्या लाभक्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवक, पंचायत समितीचे सदस्य व जि.प.सदस्य अशी बैठक बोलावुन त्यामधे चर्चा करण्यात येईल.
योजनेच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा हा उद्देश आहे. योजनेला जिल्हा परीषदेने दिलेला निधीचा खर्च योग्य रितीने व्हावा. आणि आणखी निधी देण्याचे काम करु माझे या योजनेच्या कामाला प्राधान्य राहील.
- 25 वर्षे पाण्याचा प्रश्न मिटणार ! शिवधनुष्य उचललं सुजय विखेंनी, आता गाव पाण्याच्या संकटातून मुक्त होणार
- खासदार नीलेश लंके यांंच्या उपोषणास सुरूवात ! नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याशिवाय माघार घेणार नाही…
- नेवासा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरावरील ऊस जळून खाक, आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान
- राहुरी तालुक्यात मोटारसायकलवरून अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडले, दोघांवर गुन्हा दाखल
- कर्जत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सन्मान