Nuakri Updates

दहावी पास असणाऱ्याना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल साडे तीन हजार पदांसाठी मेगाभरती !

मुंबई :- तब्बल ३६५० जागांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये भरती प्रक्रिया होत आहे आणि या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट केवळ १० वी पास इतकीच आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत जी तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि या पदांसाठी अर्ज करा.

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना पोस्टात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने तब्बल ३६५० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पद – ग्रामीण डाक सेवक

अर्ज भरण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ 

वयोमर्यादा 

  1. अर्जदार उमेदवाराचं वय कमीत कमी १८ वर्षे आणि अधिकाधिक ४० वर्षांच्या दरम्यान असावं
  2. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल

शैक्षणिक पात्रता

  1. इच्छुक आणि पात्र उमेदवार हा १० वी पास असावा
  2. कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक

पगार 

१०,००० ते १४,५०० रुपये

असा करा अर्ज – 

इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज सादर करावा. त्यासाठी उमेदवाराला आपला उमेदवारी अर्ज https://indiapost.gov.in किंवा http://appost.in/gdsonline या वेबसाईटवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जापूर्वी उमेदवाराला नाव नोंदणी करावं लागणार आहे. अर्ज नोंदणीची तारीख १ नोव्हेंबर २०१९ पासून ते ३० नोव्हेबंर २०१९ पर्यंत असणार आहे. 


Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button