आपच्या वतीने श्रीरामपुरात भव्य रास्ता रोको…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

श्रीरामपूर- शहरातील विविध भागातील रस्ते पूर्णपणे उखडले गेले आहेत सर्व रस्त्यावर जागोजागी मोठं-मोठे खड्डे निर्माण झालेले आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यात जमा होऊन रस्त्यातील साचलेल्या पाण्यामुळे अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले अनेक जीव अपघातात गेले अनेक जन कमी अधिक प्रमाणात अपंग झाले.

काही व्यक्ती आजही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत या सर्व प्रकारास घटनेस श्रीरामपूर नगर पालिकेतील सत्ताधारी हेच जबाबदार आहेत,शासनयोजणे अंर्तगत नगरपालिका निधीमधून शहरातील सर्व रस्त्याची देखभाल,दुरुस्ती, डागडुजी,होणे गरजेचे असताना राजकीय द्वेषाने पछाडलेल्या सत्ताधार्यांनी रस्त्याची कामे करण्यास जाणून बुजून टाळले आहे.

व आजही टाळत आहेत त्यामुळे शहर वासीयांवर मानव निर्मित आपत्तीने इच्छा नसताना मरणे अपंग होणे हे नशिबी येत आहे व आलेले आहे असा आरोप आम आदमी पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी रास्तारोको प्रसंगी केला.

सत्ताधारी मात्र विकासाच्या गप्पा मारण्यात मशगुल आहेत,विकासाचे गाजर दाखवून सामान्य माणसाची नगरपरिषदेने घोर फसवणूक केली आहे देवाज्ञा झालेले व अपंग झालेल्या यांचा तळतळाट श्रीरापमुर नगरपषदेतील सत्ताधाऱ्यांना लागणार आहे असे तालुका अध्यक्ष विकास डेंगळे म्हणाले.

विकासाच्या वल्गना करणाऱ्या नगरपरिषदेला देव सद्बुद्धी देवो आणि शराहतील सर्व रस्त्याची मजबुतीकरण्यासह डांबरी करण त्वरीत होवो नागरिकांची मरणाची वाट पाहू नका तुम्हाला येथेच सर्व फेडावे लागेल,देव तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा कामगार नेते नागेशभाई सावंत यांनी दिला,

नगरपालिका सत्ताधार्यांनी शहरातील रस्त्यांचे कामे न केल्या मूळे आज दिनांक 3 -11- 2019 सकाळी 10 वाजता संगमनेर नेवासा रोड बसस्टँड शेजारी रास्ता रोको करण्यात आला होता.

शहरातील रस्त्याचे कामे त्वरित न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेण्यात येईल असा इशारा पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सर्वोद्योग कामगार कर्मचारी युनियन, मराठा सेवा संघ, आदी संघटनानी पाठिंबा दिला.

यावेळी रस्त्यावर 3 स्पायडरमॅन कसरत पहिला मिळाले स्पायडरमॅन-लक्ष चोरडीया,राज डेंगळे,वेद भोसले.चिमुकल्या स्पायडरमॅन नि त्यांच्या भाषणात आमचे आई -बाबा सुखरूप घरी येतील का असा भावनिक सवाल या वेळी उपस्थित केला.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी यात आप चे जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल,कामगार नेते नागेश भाई सावंत तालुका अध्यक्ष विकास डेंगळे,राहुल रणपिसे, प्रविण जमधडे,मराठा स्वयं सेवक संघाचे राजेंद्र भोसले, आम आदमी पार्टी चे राजुभाई शेख,भारत डेंगळे, सलीम शेख,

रोहित भोसले,राजेश पाटील,दीपक परदेशी,रोहित भोसले,अक्षय कुमावत, यशवंत जेठे,हरिभाऊ तुवर,जयेश पाटील,आनंद पाटील,बाबासाहेब गवारेभैरव मोरे,,राजू यादव,अक्षय गिरमे,नितेश हिंगमिरे, रमेश भोरे,देवराज मूळे, राजू राहिंज,दीपक पांचाळ,

किरण डेंगळे,सागर देवकर,किरण गायकवाड, देवेंद्र गोरे,अनिकेत धनगे, दीपक वावधने,प्रशांत बागुल,पप्पू जेठे,रोहन उंडे, शाम कांबळे,प्रवीण लगडे ,भागवत बोंबले,देवराज मुळे, राहुल डांगे,बी.एम.पवार,योगेश तांबे,संदीप सिंगटे, राहुल केदार,

दिनेश यादव,सुनील धनवटे, सतीश धनवटे,अनिल जाधव ,सचिन जगरवल,अनिरुद्ध कुलकर्णी,आदी कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment