Ahmednagar NewsBreaking

जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव : घनश्याम शेलार

श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याने या निवडणुकीत जनशक्तीचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला आहे.

निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी तालुक्यातील जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी काल श्रीगोंद्यात पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणूक निकालानंतर शेलार पत्रकारांशी बोलत होते.

या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, काँग्रेस तालुकाध्यक्ष दीपक पाटील भोसले, संजय आनंदकर, सुनिता हिरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेलार म्हणाले की मला ऐनवेळी उमेदवारीची संधी मिळाली.

पण सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकत्र्याला लोकांनी भरभरून मतदान केले. तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कार्यकर्त्यांसह पाहणी दौरा सुरू करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

तसेच ३० टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा नियम रद्द करून, सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी. शेतकऱ्यांचा झालेल्या उत्पादन खर्चाएवढी भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सरकारकडून सध्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी काही दिवसात नागवडे सहकारी कारखाना व कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका होत आहेत. त्याबाबत शेलार यांना विचारले असता त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगत, कुकडी कारखान्याची निवडणूक राहुल जगताप व आपण सोबत राहून लढणार असल्याचे सांगीतले.

तर नागवडे कारखान्याबाबत बोलताना त्यांनी सभासदांचे हित कुणाच्या हातात सुरक्षित राहील हे महत्वाचे असून, खाजगी कारखानदार सहकारी कारखाना अडचणीत आणणार नाहीत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून त्या निवडणुकीबाबत कार्यकर्ते व सहकारी नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले तसेच श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यातही सोबत राहून एकत्रितपणे काम करणार असल्याचे सांगितले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button