Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

अहमदनगर मध्ये ‘या’ ठिकाणी भेटतेय अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अवघ्या 10 रुपयांत पोटभर जेवण देण्याचे आश्वासन दिले होते.

या घोषणेची कधी अंमलबजावणी होते हे माहित नाही पण नगर शहरात संवेदनशील व्यापारी,

व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी सुविधा केली आहे.

नगर शहरातील प्रेमदान चौकात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़

हेल्पिंग हॅण्डस मार्फत अतिशय शुध्द, सात्त्विक व पौष्टिक असा सांबार भात, खिचडी-कढी अथवा पुलाव दहा रुपयांत दिला जातो़

या सेवेचा दररोज १५० ते २०० जण लाभ घेतात़ या उपक्रमासाठी अनेक जण स्वत:हून मदतीचा हात देवून या सेवेचा विस्तार होण्याच्या दृष्टीने योगदान देत आहेत.

नगरच्या प्रेमदान चौक परिसरात अनेक हॉस्पिटल्स असून याठिकाणी परगावचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात.

या उपक्रमामुळे सर्वसामान्यांची कमी पैशांत चांगली व्यवस्था झाली आहे़ हातावर पोट असणारे, मजूर, बेघर, अनाथ यांच्यासाठीही हे केंद्र आधार ठरले आहे़

या उपक्रमासाठी राजेंद्र मालू यांनी स्वत:ची जागा देवून तेथे पत्र्याचे शेडही उभारुन दिले आहे.

ग्रुपचे सदस्य वर्गणी जमा करून रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणतात.

समाजातील काही दानशूर या उपक्रमासाठी मदत करीत आहेत़ तयार केलेले अन्न स्वच्छ प्लेटमध्ये सर्वांना उपलब्ध करून दिले जाते.

लोकांना आरामशीर भोजन घेता येण्यासाठी येथे उंच टेबलचीही व्यवस्था केली आहे़ जेवणासोबत चवीसाठी लोणचेही दिले जाते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button