Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingKrushi-BajarbhavMaharashtra

अहमदनगर बाजारभाव : अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्याच्या अनेक भागांत अद्यापही पाऊस कमी, अधिक प्रमाणात सुरूच आहे. या बदललेल्या वातावरणाचा भाज्यांवर विपरीत परिणाम झाला आहे. 

बाहेर गावाहून नगर बाजार समितीत येणाऱ्या ५० ते ७० टक्के भाज्या पावसामुळे कुजल्या आहेत. परिणामी हाती उरलेला थोडाफार माल प्रचंड चढ्या भावाने विकला जात आहे.

स्वाती नक्षत्राच्या सरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत बरसल्या. २४ ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या स्वाती नक्षत्राच्या सरी सलगपणे जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पडल्या. मात्र या सरी काही ठिकाणी इतक्या होत्या की त्या परिसरातील पिके, फळझाडे यामुळे भूईसपाट झाल्या आहेत. 

त्यामुळे शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शेतकऱ्यांनी खरिपात पेरणी केलेला लाल कांदा व कापूस परतीच्या पावसाने झोडपल्याने हातातोंडाशी आलेला घास आज हिरावला गेला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पावसाच्या सुरुवातीला पाऊस कमी प्रमाणात झाला. त्या पुरेशा ओलीवर शेतकऱ्यांनी कांदा व इतर पिके घेतली. पिकेजगविण्यासाठी भरपावसाळ्यात शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून पिके जगवली. बाजरी पीक काही प्रमाणात हातात आले असले तरी कांदा व कापूस पावसाने झोडपल्याने हातातून गेले आहे.

बाजार समितीत मिळालेले बाजारभाव : पालेभाज्या व फळभाज्या : टोमॅटो १००० – २५००, वांगी १०००. ५०००, प्लावर ५००. ३०००, कोबी ५०० – २३००, काकडी ४०० – १४००, गवार ५००० – ७०००, घोसाळे १००० – ३०००, दोडका २५०० – २५००, कारले १५०० – २५००, भेंडी १००० – २५००, वाल २५०० – ३५००, घेवडा ३००० – ४०००, तोंडुळे १००० – २०००, डिंगरी ४०००. ४०००, बटाटे १००० – १५००,लसूण १०००० – २९०००, हिरवी मिरची १००० – २५००, शेवगा ३००० – ४०००, भू.शेंग ५००० – ६०००, लिंबू २००० – ३०००, आद्रक ५००० – ७०००, दु.भोपळा १०००- २२००, मका कणसे ५०० – १०००, गाजर २००० – ३०००,

शिमला मिरची १५०० – २३००, मेथी १००० – २०००, कोथिंबीर ८०० – २४००, पालक १५०० – २०००, करडी ५००- ८००, शेपूृ भाजी ४००- ८००, कढीपत्ता १०००- १०००, मुळे १२००- १५००, चुका ६०० -६००, चवळी २५०० – ३५००, बीट १०००- २०००, वाटाणा ४५०० – ५५००, डांगर १००० – १५००. ज्वारी : ३००६-३४०२, बाजरी : १७५०-१८५०, तूर : ५२१०- ५२१०, हरबरा : ३०००-३७५०, मूग : ६०००-६५००, उडीद : ५५००- ६४००, गहू: २२००- २२५०, सोयाबीन : ३०००-३८३२, गूळ डाग- ३१४५- ३९००. मठ : ८००१. ८००१..

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button