जावयामुळे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना घ्यावा लागला हा निर्णय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वॉशिंग्टन : ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक व पत्रकार जमाल खशोग्गी यांना हत्येपूर्वी अटक करण्यास अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जारेड कुश्नर यांनी सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांना परवानगी दिली.

त्यामुळे ट्रम्प यांना उत्तर सीरियातून सैन्यवापसी करावी लागल्याचे धक्कादायक सत्य सोमवारी उजेडात आले आहे. याचवेळी कुश्नर आणि सलमान यांच्यातील संभाषणात व्यत्यय आणत तुर्कीने ट्रम्प यांना ब्लॅकमेल केल्याचेसुद्धा समोर आले. 

अमेरिकेतील आघाडीचे वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार जमाल खशोग्गी हत्याकांडासंबंधित एक नवे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. ट्रम्प यांचे जावई जारेड कुश्नर यांनी खशोग्गी यांना अटक करण्यास हिरवा कंदील दाखविला होता. 

या संदर्भात त्यांनी सौदीचे राजे मोहम्मद बिन सलमान यांना तसे स्पष्ट संकेत दिले होते. खशोग्गींना ताब्यात घेण्याचा प्लॅन सौदीने आखला होता. त्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी कुश्नर यांनी बळ दिले. कुश्नर व सलमान यांच्यातील संवाद खशोग्गींच्या हत्येपूर्वी घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

त्यामुळे खशोग्गी हत्याकांडामागे सौदीचा हात असल्याच्या आरोपाला बळ मिळत आहे. याचवेळी सौदी व अमेरिकेत कट शिजत असतानाच तुर्कीचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगन यांनी ट्रम्प यांच्यावर उत्तर सीरियातून सैन्यवापसीकरिता दबाव वाढविला. तुर्कीने ब्लॅकमेल केले व त्यांनी उत्तर सीरियातून कुमक मागे घेण्यास होकार दिला. 

त्यानंतर तुर्कीने कुर्दीश बंडखोरांविरोधात नव्याने चढाई केली आहे. ट्रम्प यांच्याद्वारे प्रशासकीय मोठी चूक होण्यापूर्वीच वरील धक्कादायक खुलासा झाला आहे.

Leave a Comment