Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता

राहुरी :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथे माहेरी भाऊबीज करून सासरी निघालेली राहुरी येथील विवाहित महिला व तिची दोन चिमुकली मुले राहुरी फॅक्टरी येथून गायब झाल्याने खळबळ उडाली.

राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड चौकात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सोनम संजय झावरे (वय २७) असे या महिलेचे नाव असून ती आपली मुले यश (चार वर्षे) व आरूष (अडीच वर्षे) या दोघांना घेऊन माहेरी गोंधवणी येथे भाऊबीजेसाठी गेली होती.

रविवारी दुपारी २ वाजता सोनमचा आपल्या दोन लहान मुलांसह श्रीरामपूर-पुणे बसमधून (एमएच १४ – ४८९९) राहुरीला येत होती.

दुपारी अडीचच्या सुमारास बस राहुरी फॅक्टरी चौकात आल्यानंतर सोनम व दोन लहान मुले खाली उतरले होते. काही वेळाने श्रीरामपूरकडून राहुरीच्या दिशेला जाणारी पांढऱ्या रंगाची तवेरा राहुरी फॅक्टरी चौकात थांबली. या तवेरात तिघे मायलेक बसले.

ही तवेरा राहुरीला न थांबता नगरच्या दिशेला निघून गेली. उशिरापर्यंत सोनम व दोन लहान मुलं घरी न परतल्याने नातेवाईकांनी सोनमचा राहुरी फॅक्टरी येथे शोध घेतला. ताहराबाद चौकात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सोनम व दोन लहान मुलं एसटी बसमधून उतरून तवेरामध्ये बसल्याचे दिसले.

रविवारी सायंकाळी नातेवाईकांनी सोनम व दोन लहान मुलं हरवल्याची खबर राहुरी पोलिसांना दिली. सोमवारी सायंकाळपर्यंत सोनम व दोन लहान मुलांचा ठावठिकाणा मिळाला नव्हता.

एसटी बस राहुरी येथे जाणार असताना सोनम व दोन लहान मुलं राहुरी फॅक्टरी येथे कशी उतरली, हा सवाल सर्वांनाच चक्रावून टाकणारा ठरला आहे. सोनमजवळ असलेल्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो बंद असल्याचा संदेश मिळाला. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button