राहुरी :- तालुक्यातील एका गावातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलीवर १५ ते १६ वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून मुलीच्या आईने हा प्रकार पाहिला.
त्यानंतर शेजारीच राहणारा हा आरोपी मुलगा पळून गेला. याप्रकरणी आज पिडीत मुलीचे नातेवाईक लहान मुलीला घेवून पोलिसांकडून आले होते. राहुरी पोलिसांनीही घटनेची गांभिर्य लक्षात घेवून आरोपी शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना केले.

दुपारी उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी व तपास सुरु होता. दरम्यान शेजारच्या मुलाकडून अशाप्रकारे ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
- अहिल्यानगरमधील भोरवाडीमध्ये यात्रेनिमित्त हजारो बैलगाडा शौकिनांच्या उपस्थित रंगला शर्यतीचा थरार
- IMDb 2025 : ‘छावा’ने बाजी मारली, तर ‘ड्रॅगन’ दुसऱ्या स्थानी; IMDb वरील टॉप-10 चित्रपटांची यादी जाहीर!
- गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भगवानगडावर हजारो भाविकांची गर्दी, गुरूपौर्णिमा केली साजरी
- सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल ! 11 जुलै 2025 रोजी 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रातील 10 ग्रॅमचा भाव पहा….
- कुकडीच्या डाव्या कालव्यावर पूल बांधले जाणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत दिले निर्देश