श्रीरामपूर: प्रभात दूधचे सारंगधर निर्मळ यांच्या बंगल्यातील चोरीची घटना ताजी असतानाच खैरी निमगाव येथील सात घरांतून सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. खैरी निमगाव येथील राजेंद्र ढोबळे हे पत्नी, मुलांसह दिवाळीत अंदरसुलला गेले होते.
चोरट्यांनी कटरने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. उचकापाचक करत १२ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी चोरून नेले. त्यांच्या शेजारी राहत असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे स्वीय सहायक अप्पासाहेब दुशिंग यांच्या घरातदेखील त्याच पद्धतीने प्रवेश करत दोन तोळे सोने आणि ४ हजार रुपये लांबवण्यात आले.

माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोपीचंद भागडे यांच्या घरातील अडीच तोळे सोने आणि १२ हजार रुपये, भानुदास कचरू जाधव यांच्या घरात आवारातून प्रवेश करत संदीप जाधव यांच्या खिशातील पाकिटातून ७ हजार ३०० रुपये, मुलीच्या गळ्यातील ओम चोरट्यांनी लांबवला.
लीलाबाई पंढरीनाथ जोजे आणि देवराम तुपे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कटरने तोडून सामानाची उचकापाचक चोरांनी केली. घरी कोणी नसल्याने कितीची चोरी झाली हे समजू शकले नाही.
- संगमनेरमधील भूमिगत गटारात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसान भरपाई द्यावी, आमदार सत्यजित तांबेंची मागणी
- जगातील एकमेव मंदिर असणाऱ्या अहिल्यानगरमधील शुक्राचार्य मंदिराला हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी भेट देत घेतले दर्शन
- रणबीर कपूरच्या ‘रामायण’मध्ये कोण काय भूमिका साकारणार? बजेट, रिलीज डेट, सगळी माहिती वाचा येथे!
- पुढील २५ वर्ष तुमच्या मुला-बाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही- माजी खासदार सुजय विखेंची शेतकऱ्यांना ग्वाही
- दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाऐवजी मोबाईल वापरण्याकडे वाढलाय कल, पालकांमध्ये चिंतेच वातावरण