खा.डॉ.सुजय विखेंकडून ‘त्या’ अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाथर्डी –
कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत संसदेच्या अधिवेशनानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अंतिम बैठक घेऊ, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी अधिकारी व ठेकेदाराची कानउघाडणी केली. 

डिसेंबरअखेर काम मार्गी लावा; अन्यथा माझ्या मर्जीतील ठेकेदारांकडून काम पूर्ण करून घ्या, त्याची जबाबदारी मी घेतो, असेही ते म्हणाले.

तहसील कार्यालयात सोमवारी महामार्गाचे अधिकारी, पदाधिकारी, ठेकेदार प्रतिनिधी व कार्यकर्त्याची बैठक विखेंच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण भोर, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, अभय आव्हाड, माणिक खेडकर, राहुल राजळे, अनिल कराळे, पुरूषोत्तम आठरे, काशिनाथ लवांडे, अर्जुन शिरसाठ, मोहन पालवे, भगवान आव्हाड, अजय रक्ताटे, अभिजित गुजर यावेळी उपस्थित होते.

विखे म्हणाले, रस्त्याच्या कामात यापूर्वी काय व्यवहार घडले याचे देणे-घेणे नाही. माझा टक्केवारीचा धंदा नाही. ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण न झाल्यास मी काय पवित्रा घेईन हे आज सांगू शकत नाही. आठवड्याच्या आत शहर हद्दीतील महामार्गाची दुरुस्ती झालीच पाहिजे. 

महामार्गाच्या समस्या, आर्थिक अडचणी व भूसंपादनाबाबत नाशिक, औरंगाबाद, नगर येथील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन. खराब रस्त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. अजून किती निरापराधांनी प्राण अर्पण करावेत, अशी प्रशासनाची इच्छा आहे. 

दिरंगाई, हलगर्जीपणा व दर्जाबद्दल अजिबात तडजोड करणार नाही. पैठण – पंढरपूर पालखी मार्गाला गती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. आंबेडकर चौक रस्त्याची पायी चालत जाऊन विखे यांनी पाहणी केली. गुडघाभर खोल खड्डे पहात त्यांनी दुरवस्थेचा अंदाज घेतला.

Leave a Comment