Breaking

शरद पवारांनी भाजप सरकारला दिला ‘हा’ इशारा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी, वाहन उद्योग, लघुउद्योग आणि बांधकाम क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला असून देशाच्या विकास दरात (जीडीपी) मोठी घसरण झाली आहे.

देशाची बिघडत चाललेली अर्थव्यवस्था सरकार लवकर रुळावर आणावी अन्यथा जनता धडा शिकवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. बुधवारी पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात देशाच्या आर्थिक स्थितीविषयी मोठी चिंता व्यक्त केली.

पवार म्हणाले की, एनडीए सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या वर्षी (२०१५ ) शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा दर ३९ टक्केवर गेला. त्यानंतर सहा वर्षात देशात १५००० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.

नोटबंदीने सहकारी पतपुरवठा पद्धती कोसळली असून यंदा पहिल्या त्रैमासिक काळात कृषी विकास दर २ टक्के इतका निच्चांकी घसरल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

अवजड वाहनांच्या विक्रीत यंदा ३९ टक्के, दुचाकी विक्रीत २३ टक्के आणि स्कूटर विक्रीत १६ टक्के घट झाली. परिणामी ३ लाख लोकांचा रोजगार हिरावले गेल्याचा दावा पवार यांनी केला. चुकीच्या आर्थिक धोरणांचा लघुउद्योगांना मोठा फटका बसल्याचे ते म्हणाले.

भिवंडी, मालेगाव येथील १० हजार पाॅवरलुमना बंद पडले आहेत. तसेच मुंबईतील १ हजार कातडी उद्योग बंद झाले असून त्यातील १० हजार कामगार बेकार झाल्याचे ते म्हणाले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button