राहुरी: म्हैसगाव , शेरी चिखलठाण येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली. यावेळी ‘ पिकांच्या नुकसानीसह, वाहून गेलेल्या शेतीचे स्वतंत्र पंचनामे करावेत’ , अशी सूचना त्यांनी तहसीलदारांना केली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मोबाईलवर संपर्क साधून , नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी . रस्त्यांच्या कामासाठीही निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

ओढे – नाल्यांतील पाण्यातून वाट काढत , उंच – सखल जमिनीवरील चिखल तुडवत , दोन किलोमीटर पायी चालून तनपुरे यांनी फुटलेले बंधारे पाहिले . वाहून गेलेली शेती व ऊसपिके , मुळासकट उपटलेल्या डाळिंबबागा खराब झालेले रस्ते , असे विदारक चित्र पाहून तनपुरे हळहळले.
रस्ते व बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले .
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या ड्रोनच्या साह्याने कुरणदरा ओढ्याच्या दुतर्फा शेतजमिनींच्या नुकसानीचे चित्रीकरण करण्यात आले .
दरम्यान, पिकांच्या नुकसानीसाठी जिरायती क्षेत्राला रुपये ६८०० , तर बागायत क्षेत्राला १८ हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाईल . वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी ३७ हजार ५०० व मातीचा भर जमा झालेल्या शेतजमिनीसाठी १३ हजार ५०० रुपये मदत दिली जाईल, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले.
- प्रत्येक लँडिंगला हजारो टन दाब सहन करतात, तरीही विमानाचे टायर फुटत का नाहीत? जाणून घ्या कारण!
- मयत व्यक्तीच्या ‘या’ वस्तू चुकूनही वापरू नका ! नाहीतर….; मयत व्यक्तींच्या वस्तूंबाबत गरुड पुराण काय सांगत पहा?
- आमदार संग्राम जगताप यांना संरक्षण द्या, अन्यथा या जिहादी प्रवृत्तींना धडा शिकवण्याचं काम आम्ही करू, धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
- अहिल्यानगरमध्ये मोहरमच्या दिवशी तब्बल ४४० जणांना शहरातून करण्यात येणार हद्दपार, पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त
- अहिल्यानगर जिल्ह्यात ७२ टक्के पेरण्या पूर्ण, मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली