BreakingIndia

२ हजारांच्या पैजेपोटी तो झाला ५० अंडे खायला तयार, तो जिंकेल असे वाटत असतानाच त्याच्यासोबत झाले असे काही की…

आपल्यापैकी अनेक जण थट्टा मस्करी मध्ये पैज लावत असतात, ‘ मी पैंज लावू शकतो’ ‘लाव शर्त’ अशा गोष्टी चालू असतात. काहीतर याला सूत्र शब्द म्हणून वापरतात. परंतू या पैंजा कधी कधी खूप महागात पडतात. जौनपुर मध्ये असच या पैजेचा एकजण शिकार शिकार झाला यात त्याला आपला जीव गमवावा लागला.

# काय आहे नक्की प्रकरण?

जौनपुर मध्ये एक बिबिगंज नावाचा बाजार आहे. स्थानिक वृत्तपत्रांच्या अहवालानुसार, कला धौरहरा गावात राहणाऱ्या सुभाष यांचा स्वतःचा व्यवसाय आहे.१ नोव्हेबर या दिवशी सुभाष आपल्या मित्रांसोबत अंडे खायला गेले.

तिथे थट्टा मस्करी मध्ये कोणीतरी सहजच बोलून गेले’ कोण कीती अंडे खाऊ शकतो?’ हसता हसता पैंज पण लागली.

पैंज अशी होती की जर कोणी ५० अंडे खाऊन १ बाटली दारू प्यायला तर तो जिंकला. हीच पैंज जिंकण्यासाठी सुभाष पुढे आला. त्यांना  पाहण्यासाठी बाजारात गर्दीही जमा होऊ लागली होती.

सुभाष यांनी अंडे खायला सुरुवात केली. प्रत्येक अंड खाताना लोग त्यांना प्रो्साहित करत होते,४० अंडे खाऊन झाल्यावर लोकांनी त्यांच्या साठी टाळ्या वाजवल्या.४१ अंडे तर सुभाष यांनी खाल्ले. जसं त्यांनी ४२व अंड खाल्ल, ते तिथेच जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले. लोक सुभाष यांना जवळच्याच दवाखान्यात घेऊन गेले.तिथे रात्री उशिरा पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला.

# याच वर्षी केलं दुसर लग्न

सांगितलं जात की,  सुभाष यांनी याच वर्षी दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या पत्नी पासून चार मुली होत्या. सुभाष यांनी दुसर लग्न जवळपास ९ महिन्यांपर्वी केलं होतं. त्यांची पत्नी गर्भवती होती. परंतु आता सुभाष राहिले नाही. आसपास लोक या घटनेची चर्चा करतात. काही लोक यात सुभाष याची चूक सांगतात , काहीजण त्यांच्या मित्रांची चूक सांगतात, कि त्यांनी हे सगळ थांबवणं गरजेचं होतं. मुद्दा काहीही असो परंतू यात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button