मोदींवर लेख लिहिल्यामुळे पत्रकाराचे ओसीआय कार्ड रद्द झाले?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : लेखक तथा पत्रकार आतिशअली तासीर यांचे ‘ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया’ (ओसीआय) कार्ड भारत सरकारने रद्द केले आहे.

ब्रिटनमध्ये जन्मलेले आणि मूळचे पाकिस्तानी असलेले लेखक आतिशअली तासीर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘टाइम’ मॅगेजिनमधील एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘डिव्हायडर इन चीफ’ असे म्हटलेले होते. या लेखामुळेच त्यांचे ओसीआयचे कार्ड रद्द करण्यात आलेले असल्याचा आरोप केला जात आहे.

गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय तासीर यांनी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही आणि महत्त्वाची माहिती लपवून ठेवली आहे. एखाद्या व्यक्तीने सत्य लपवून फसवणुकीच्या मार्गाने ओसीआय कार्ड मिळविले असेल तर त्या कार्डाचे नोंदणीकरण रद्द केले जाईल आणि त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. 

तसेच भविष्यकाळात अशा व्यक्तीस भारत प्रवेशावरही बंदी घालण्यात येईल, असे म्हटलेले आहे. मात्र, ‘टाइम’मध्ये मोदींवर लेख लिहिल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप गृहमंत्रालयाने फेटाळून लावला आहे.

Leave a Comment