सिलिंडरचे दर तब्बल ११३ रुपयांनी वाढले!

मुंबई : विधानसभा निवडणुका होताच नाशकात सिलिंडरचे दर तीन महिन्यांत तब्बल ११३ रुपयांनी वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची घट होऊन, दर ५६७ रुपये ५० पैसे होते.

त्यानंतर निवडणुका होताच सिलिंडरचे दर हळूहळू वाढत दि. १० नोव्हेंबरअखेर तब्बल ६८० रुपयांवर गेले आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या वेळी विनाअनुदानित सिलिंडरच्या (१४.२ किलो) भावात ७७ रुपयांनी वाढ झाली असून, याचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला आहे.

राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. अजून नवे सरकार स्थापन झालेले नाही; मात्र राज्यात केंद्र सरकारने सिलिंडर दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या चार महिन्यांपासून दर महिन्याला सिलिंडरची दरवाढ होत आहे.

तीन महिन्यांत १४.२ किलोचे घरगुती सिलिंडरचे दर ११३ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये १५.५० रुपये, तर ऑक्टोबरमध्ये १३ रुपयांनी दर वाढलेत.