शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आज मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरुवातीला त्यांची नियमित वैद्यकीय चाचणी केली जात असल्याचं सांगितलं जात होतं.

संजय राऊत यांच्यावर काही वेळापूर्वीच अँजिओग्राफी करणात आली होती. यावेळी त्याच्या रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळले आहेत. 

Loading...

संजय राऊत यांचे भाऊ आणि आमदार सुनील राऊत यांनी काही वेळापूर्वीच अशी माहिती दिली की, संजय राऊत यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस सापडल्यामुळे आता त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया देखील सुरु करण्यात आलं आहे.