जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

सोनई : सोनई येथील गजबजलेल्या माधवबाबा चौकातील जुगार अड्ड्यावर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्धन सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून समजले की, माधवबाबा चौकात काहीजण तिरट नावाचा जुगार खेळत आहेत. त्यानुसार तेथे सोनई पोलिसांनी छापा टाकला.

तेथे सादिक लतिब शेख (३९, रा. गडाख गल्ली, सोनई), नागेश कोंडीराम गुंजाळ (वय ३८, रा. मुळा कारखाना), अजय केशव गडाख (वय ३९, रा. गडाख गल्ली, सोनई), रियाज शेख (वय २४, रा. सोनई) हे पत्त्यांवर तिरट नावाचा जुगार खेळताना आढळून आले.

आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल अमोल जवरे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींकडून रोख रक्कम व मोबाइल, असा २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.