आ. थोरातांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
संगमनेर : सहकारामुळे रोजगार निर्मिती होवून ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. शासनाने नेहमी सहकाराला पूरक असे धोरणे घेणे गरजेचे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार राज्यात प्रथम असून, शेतकऱ्यांसाठी शाश्­वत असलेल्या ऊस पिकाची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५३ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार डॉ. तांबे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अ­ॅड. माधवराव कानवडे होते. व्यासपीठावर बाजीराव खेमनर,
सौ. कांचनताई थोरात, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, बाबा ओहोळ, इंद्रजित थोरात, सभापती निशाताई कोकणे, डॉ. जयश्रीताई थोरात, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, साहेबराव गडाख, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, शिवाजीराव थोरात, अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, राहाता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे,
डॉ. शेखर बोऱ्हाडे, शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, रवि मोरे, सुधाकर रोहम, विश्­वास मुर्तडक, निर्मलाताई गुंजाळ, शांताबाई खैरे, गणपतराव सांगळे, सुभाष सांगळे, अर्चनाताई बालोडे, राजेंद्र कडलग, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी ड्रोनद्वारे तांबेरा रोगावर फवारणीसाठीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
आ. डॉ. तांबे म्हणाले, यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. अनेक भागात कांदा, सोयाबीन, बाजरी यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहे.
पीक विमा कंपन्या फक्त पंचनामे करीत आहे. एकरी ३००० रुपये मदत ही अतिशय तुटपुंजी असून, पीक विमा कंपन्यांची नफेखोरी सरकारने रोखावी. आ. थोरात यांनी नवीन कारखाना निर्मितीचा घेतलेला निर्णय अत्यंत दूरदृष्टीचा ठरला असून, राज्यात या उपक्रमाचे कौतुक झाले आहे.
चांगले व्यवस्थापन व समर्पित भावनेने काम, यामुळे शेतकरी सभासद यांचा मोठा विश्­वास कारखान्याने जपला आहे. एकरकमी एफआरपी देताना बाहेरील शेतकऱ्यांनाही चांगल्या सुविधा देण्यासाठी कारखाना कटीबद्ध असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment