निवडून आलेले ते सर्व आमदार बिनकामाचे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने आता राज्यात निवडून आलेले 288 आमदारांना कोणतेच अधिकार राहिले नसून. यामुळे हे सर्व आमदार बिनकामाचे ठरणार आहेत.

राष्ट्रपती राजवटीमुळे राज्यात निवडून आलेले 288 आमदार यांना कोणतेच अधिकार राहणार नाही.राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत त्यांची अवस्था अशीच राहणार आहे.

दरम्यान या आमदारांचं विधानसभा सदस्यत्व कायम राहणार असून जोपर्यंत विधानसभा बरखास्त करण्यात आल्याचं जाहीर होत नाही, तोपर्यंत विधानसभा स्थगित आहे, असं समजलं जाणार आहे.

विधानसभेची मुदत संपल्यामुळे ती आपोआप बरखास्त झाली असून नवीन सरकार स्थापन करण्याऐवढे संख्याबळ कोणत्याच पक्षाने सिध्द केले नसल्याने नवीन आमदारांना अद्याप आमदार असल्याची शपथ घेतलेली नाही.

अधिकार नसल्याने या आमदारांना प्रशासनातील अधिकारी यांना सुचना, आदेश देण्यासोबत सरकारी दौरे करता येणार नाहीत. तर उलट राज्याचे मुख्य सचिव यांना मुख्यमंत्र्याप्रमाणे अधिकार प्राप्त होणार असून आहेत.

मंत्रालयातील सचिवांकडे ‘अधिकार’

राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव हे मंत्रीमंडळाप्रमाणे राज्यपाल यांच्याशी राष्ट्रपती राजवटीत सल्लामसलत करून राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणार आहेत. यामुळे राज्याचा गाडा राज्यपाल यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयातील सचिवांच्या खांद्यावर राहणार आहे.

Leave a Comment