भाजपाला देणगी देणारा टाटा ट्रस्ट सर्वात मोठा देणगीदार, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा दिला निधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवी दिल्ली : भाजपाला २०१८ -१९ सालादरम्यान धनादेश व ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटींचा निधी मिळाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ३५० कोटीची देणगी टाटा ट्रस्टकडून देण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाने निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या दस्तावेजामध्ये ही माहिती दिलेली आहे.

भाजपाकडून निवडणूक आयोगाला ३१ ऑक्टोबर रोजी पक्षाला मिळालेल्या देणगीची माहिती देण्यात आली आहे. त्यानूसार आर्थिक वर्ष २०१८-१९ दरम्यान धनादेश व ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून भाजपाला एकूण ७०० कोटींहून अधिक निधी मिळाला.

यामध्ये सर्वात मोठा देणगीदार टाटा ट्रस्ट ठरला आहे. टाटा समूहाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या ‘प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’ने भाजपाला ३५६ कोटींची देणगी दिली आहे. या ट्रस्टला भारती ग्रुप, हिरो मोटोकोर्प, जुबिलँट फूडवर्क्स, ओरियंट सीमेंट, डीएलएफ, जेके टायर्स सारख्या कॉरपोरेट घराण्यांचे समर्थन आहे. 

 

जमा करण्यात आलेली माहिती २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या निधीशी संबंधित आहे. हा पैसा देखील चेक किंवा ऑनलाईन पद्घतीने आलेला आहे. यामध्ये निवडणूक बाँड स्वरूपात आलेल्या निधीचा समावेश नाही.
आचार संहितेनुसार राजकीय पक्षांना आर्थिक वर्षादरम्यान मिळणाऱ्या निधीचा खुलास करणे अनिवार्य आहे. परंतु जर देणगी ही २० हजारपेक्षा कमी असेल किंवा निवडणूक बाँड स्वरूपात देण्यात आली असेल तर त्याचा खुलासा करण्याचे बंधन राजकीय पक्षांवर नाही.

Leave a Comment