वाळूतस्करीची ही नवी पद्धत एकूण तुम्हालाही धक्का बसेल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर : शहरापासून हाकेच्या अंतरावर व अकोले बायपासजवळ असलेल्या प्रवरा नदीपात्रात वाळू तस्करांनी अक्षरश: धिंगाणा घातला आहे. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, पाण्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांनी एक वेगळीच शक्कल लढविली आहे.

ट्युबच्या सहाय्याने हे वाळू तस्कर आल्हादपणे वाळू उपसा करीत आहे. दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा होत असताना देखील याकडे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे का दुर्लक्ष आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

मुळा व प्रवरा या दोन्ही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर सर्रासपणे अवैधरित्या वाळू उपसा करीत आहे. असे असले तरी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी ठिकठिकाणी छापे टाकत वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे वाळू तस्करांनीही त्यांचा चांगलाच धसका घेतला आहे.
एकीकडे महसूल विभाग का कारवाई करीत नाही, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. शहरापासूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रवरा नदीपात्रात पाणी असताना देखील जवळपास वीस ते तीस वाळू तस्कर दिवसाढवळ्या अवैधरित्या वाळू उपसा करीत आहे.
विशेष म्हणजे पाण्यातून ही वाळू कशी बाहेर काढायची त्यासाठी या वाळू तस्करांनी चांगलीच शक्कल लढविली आहे. प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये ही वाळू भरायची आणि ती ट्युबच्या सहाय्याने आल्हादपणे बाहेर काढायची, ट्युबच्या माध्यमातून तीन ते चार वाळूने भरलेल्या गोण्या बाहेर काढता येत आहे. त्यानंतर रिक्षातून वाळू तस्कर या गोण्यांची वाहतूक करीत आहेत.पाण्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. 

Leave a Comment