अवघ्या नऊ वर्षांचा हा चिमुकला होणार पदवीधर! 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ॲमस्टरडॅम : अवघ्या नऊ वर्षांच्या वयात जगातील सर्वात तरुण पदवीधर बनण्याचा विश्वविक्रम नेदरलँड्समधील एका चिमुकल्याकडून नोंदविला जाणार आहे.

नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅममध्ये राहणाऱ्या लॉरेंट सिमन्स या चिमुकल्याची इले्ट्रिरकल अभियांत्रिकीचे पदवी शिक्षण पुढील महिन्यात पूर्ण होत आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम वयाच्या १०व्या वर्षी पदवीधर होणाऱ्या अमेरिकेच्या मायकेल केर्नीच्या नावावर आहे.

तल्लख बुद्धिमत्तेचा धनी असलेला लॉरेंट सिमन्सचे एंडहोव्हन तंत्रज्ञान विद्यापीठात इले्ट्रिरकल अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू आहे. जवळपास १४५ बुद्ध्यांक असलेल्या सिमन्सला पुढील महिन्यात पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे. इतक्या लहान वयात पदवीधर बनणारा तो जगातील पहिला मुलगा ठरेल.

सिमन्सने आपले उच्च माध्यमिक शिक्षण वयाच्या ८व्या वर्षी पूर्ण केले. पदवी झाल्यानंतर पुढे पीएच.डी. करण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्यातील क्षमता पाहून जगभरातील विविध प्रतिष्ठित विद्यापीठांनी पीएच.डी.साठी आपल्या विद्यापीठांचे दरवाजे उघडले आहेत.

बेल्जियममध्ये जन्मलेल्या लॉरेंटकडे अलौकिक बुद्धिमत्ता असलेला मुलगा म्हणून पाहिले जाते. इतकेच नाही, तर त्याची तुलना प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन व स्टीफन हॉकिंग यांच्यासोबत केली जाते.

Leave a Comment