अखेर त्यांच ब्रेकअप झालं!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मुंबई :- गेले अनेक वर्ष एकत्र असलेल्या शिवसेना आणि भाजपचे अखेर ब्रेकअप झाल आहे, शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहिली आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

NDA मध्ये मालकशाही चालणार नाही. आम्ही महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी NDA मधून बाहेर पडत आहोत. आम्ही NDA मधून बाहेर पडलो नसतो तर राज्यातील जनतेने आम्हाला माफ केले नसते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. हे आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला शिवसेना तयार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना यांची ३० वर्षांची युती संपुष्टात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेला हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण दिलेले नाही.

शिवसेना खासदार संजय राऊत आणि अनिल देसाई हे राज्यसभेचे सदस्य आहेत.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत तसा खुलासाही केला आहे.

आता शिवसेना ‘रालोआ’तून बाहेर पडली तर त्यांच्या खासदारांची जागा बदलेल. दोन्ही सभागृहात शिवसेना नेते सत्ताधारी बाजूच्या बाकांवर बसत होते. ते आता विरोधी बाकांवर बसतील.

Leave a Comment