या कारणामुळे झाला त्या तरुणावर तलवारीने हल्ला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- शहरातील सौरभ ऊर्फ बंडू भीमाजी मते (२२) या तरुणावर शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन तरुणांनी तलवार, तसेच चॉपरने वार केले. या हल्ल्यात बंडू मते हा गंभीर जखमी झाला असून त्यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्राथमिक उपचारानंतर बंडू यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.शहरातील तरुणांच्या दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. दोन्ही गटांकडून एकमेकांना बेदम मारहाणही झालेली आहे. त्याचेच पर्यावसन बंडू मते याच्यावरील हल्ल्यात झाले.

बंडू याने गुरुवारीच श्रुती तंदुरी चहाचे दुकान डॉ. आंबेडकर चौकात सुरू केले होते. शुक्रवारी सकाळी बंडू चहाचे दुकान उघडून ते सुरू करण्याच्या तयारीत असतानाच संग्राम चंद्रकांत कावरे व गणेश चंद्रकांत कावरे या दोघा भावांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केला.
वादाचे रूपांतर हाणामारी होऊन दोघांनी त्याच्या हातापायांवर तलवार, तसेच चॉपरने वार केले. दोघांच्या तावडीतून निसटून बंडू याने जामगाव रस्त्याकडे पळ काढला मात्र, पाठलाग करून दोघांनी डॉ. आंबेडकर स्मारकासमोर त्याच्यावर तलवार तसेच चॉपरने पुन्हा वार केले.
या हल्ल्यामध्ये बंडू याच्या उजव्या हाताच्या मनगटावर तलवार, तसेच चॉपरचे असंख्य वार झाल्यामुळे त्याचा तळहात मनगटापासून सुमारे ८० टक्के तुटला आहे. उजवा हात, दोन्ही पायांवरही असंख्य वार करण्यात आल्याने बंडू आंबेडकर स्मारकासमोर विव्हळत पडला होता.
हल्ल्यानंतर दोघे कावरे बंधू दुचाकीवरून फरार झाले. घटनेची माहिती समजल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बंडू यास नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
त्यानंतर गवळी हे पथकासह आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. या घटनेमुळे पारनेर शहरात खळबळ उडाली. आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात येऊन दोघांचाही शोध घेण्यात येत आहे.

Leave a Comment