अपहरण झालेले उद्योजक करीम हुंडेकरी यांची सुखरूप सुटका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :-  आज सकाळी पिस्तूलाच्या धाकाने अपहरण झालेले शहरातील प्रतिष्ठित उद्योजक करीम हुंडेकरी यांना पोलिसांच्या पथकाने औरंगाबाद-जालना रोडवरुन सुखरुपपणे ताब्यात घेतले असून उद्योजक हुंडेकरी यांना सव्वातीन वाजता नगरमध्ये आणण्यात आले आहे.

शहरातील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज पहाटेच्या सुमारास कोठला परिसरातून सिनेस्टाईल अपहरण झाले होते. या घटनेुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.

अपहरणकर्त्यांच्या माहिती काढून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. अपहरण झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी हुंडेकरी यांची सुखरूप सुटका केली.

काही तासामध्येच पोलिसांच्या पथकाने तपासाची सूत्रे हलवून उद्योजक हुंडेकरी यांची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केली. आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी यांचे सिनेस्टाईल अपहरण

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/18/news-businessman-hundekari-kidnapped-a-cinestyle/

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांची अशी झाली सुटका, जालन्यातून थेट बस द्वारे असे पोहोचले अहमदनगर मध्ये !
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/18/krimbhai-hundekari-kidnap-news-story-ahmednagar-reached-by-bus-directly-from-jalna/

Leave a Comment