अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजक हुंडेकरी अपहरण प्रकरणातील दोन आरोपींना अटक

अहमदनगर :- शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि हुंडेकरी लॉन्सचे प्रमुख करीम हुंडेकरी यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अपहरण करणार्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या अपहरण प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्या दोघांची चौकशी सुरू आहे.अपहरणानंतर काही तासांतच पोलिसांनी हुंडेकरी यांची सुटका केली होती. परंतु आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले होते.

हुंडेकरी मोटर्स शोरूमचे संचालक हुंडेकरी यांचे अज्ञात चार जणांनी काल  धमकावून अपहरण केले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकांनी त्यांचा शोध सुरू केला.

दुपारच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. या अपहरण नाट्यामागील आरोपींचा पोलीस शोध घेत होते. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी परतूरमधून ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Loading...

हुंडेकरी यांच्या अपहरण प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने जालना जिल्ह्यातील परतूर येथे कारवाई करून दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दुपारी उशिरा समजली आहे.

हे दोघेही सराईत गुन्हेगार असून सुपारी घेऊन कामे करत असल्याचे समजते. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अजहर शेख हा तेथून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक अजहर शेख याच्या तपासासाठी जालना भागात तळ ठोकून होते.

परतूर परिसरात आज (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास पोलिस पथकाने प्रारंभी अजहर याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतल्याचे यावेळी अजहर त्यांच्यासोबत मिळून आला नाही.