अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन १२ तास सामूहिक बलात्कार !

मुंबई :- एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना नालासोपारात घडली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय पीडित मुलगी शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी आपल्या घरातून बाहेर पडली होती. यावेळी रिक्षातून आलेल्या आरोपींनी चाकूचा धाक दाखवत तिचं अपहरण केलं.

Loading...

यानंतर आरोपींने तरुणीला रिक्षात बसवून एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत नेलं.बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत आरोपींनी पीडित तरुणीला नेलं आणि त्यांतर तिच्यावर १२ तास बलात्कार केला.

शनिवारी सकाळी पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. या घटनेतील चार आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे,

तर अद्याप चौथा आरोपी हा फरार आहे. सर्व आरोपींवर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.