Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

शिर्डी :- जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या काल घडलेल्या पोलिसावर गोळीबार प्रकरणातील  गोळीबार करणारा आरोपी सचिन लक्ष्मण ताके , वय ३२ , रा . शिरसगाव , ता . श्रीरामपूर याला रात्री ८ . ०५ वा . अटक करण्यात आली. 

दरम्यान दुसरा फरार आरोपी अमित सांगळे याचा कसून शोध घेतला जात आहे . कालच्या राहाता ते चितळी जाणान्या रोडवरयादगार हॉटेल समोर व्यापारी संकुलाच्याजवळ पोलीस कर्मचारी अजित अशोक पटारे व रशीद शेख हे तोंडाला रुमाल बांधून दोघा संशयित असलेली दुचाकी नं . एमएच १७ सीएफ ८२९९ हिला हटकले तेव्हा त्यातील एका आरोपीने चौकशी करणाऱ्या पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली . त्यात पोलीस कर्मचारी अजित पटारे हे जखमी झाले . त्यांच्या गालावर गोळी लागून ते रक्तबंबाळ झाले.

अशाही अवस्थेत पटारे यांनी एकाला दोन्ही हाताने पकडले . मात्र पुन्हा जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून फायर केला तेव्हा पटारेंच्या हाताला गोळी लागली . तेव्हा शेख यांनी सदर इसमास पकडण्याचा प्रयत्न केला . मात्र आरोपी झटापटीत रस्त्यावर पडला.

त्याच्या डोक्याला मार लागला . मोटारसायकल चालविणारा आरोपी दुचाकी सोडून पळून गेला , तर पकडलेला आरोपी सचिन लक्ष्मण ताके असल्याचे समोर आले . त्याने साथीदार अमित सांगळेचे नाव सांगितले. याप्रकरणी पोका रशीद बादशाह शेख , नेमणूक राहाता पोलीस स्टेशन – यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सचिन लक्ष्मण ताके , अमित सांगळे या दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button