भारतीय स्टेट बँके शाखेच्‍या मॅनेजरकडुन जेष्ठ नागरीक व ग्राहकांना दिला जातो खाते बंद करण्याचा सल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोणी : लोणी येथे असलेली भारतीय स्टेट बँकेची शाखा ग्राहकांसाठी असुन नसल्यासारखीच आहे. अनेक जेष्ठ नागरीक व विद्यार्थ्यांना या शाखेत रोजच अरेरावीच्या भाषेला सामोरे जावे लागत आहे.

लोणी बुद्रुक परिसरात भारतीय स्टेट बँकेंची शाखा आहे. या बॅंकेत परिसरातील जेष्ट नागरीक, शालेय विद्यार्थी तसेच अन्य खातेदारांची खाती आहेत. शासनाच्‍या वृध्‍दापकाळ योजनेचे पैसे काढण्‍यासाठी तसेच अन्य व्यवहारासाठी नागरीक येत असतात परंतु या बॅंकेतील आधिकारी व कर्मचारी रोजच अरेरावीची भाषा वापरतांना दिसत आहेत.

अनेक ग्राहकांना लिहीता व वाचता येत नाही, वय झाल्‍यामुळे व्‍यवस्थित मार्गदर्शनाची गरज असताना त्यांना बॅकेत फक्त फिरवल जात.

जेष्ठ नागरीक शासकीय व अन्‍य कामांसाठी या बॅंकेत चकरा मारत असतात. परंतु या बॅंकेत कर्मचारी त्यांना अतिशय हीन दर्जा वागवणुक देत आहेत. आधार कार्ड आणा, फोटा आणा, तुम्‍हाला बॅंकेचे नियम माहीती आहेत का असे अनेक प्रश्‍न विचारुन ग्राहकांना त्रस्‍त करण्‍याचे काम हे कर्मचारी करीत आहेत.

एका जेष्ठ व महीला नागरीकाला अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. त्यांनी एका शिक्षीत व्यक्तीला घेवुन संबधित शाखाधिकार्याला जाब विचारला असता त्यांनी आमच्या बॅंकेतुन या जेष्ठ नागरीकांनी खाते बंद करावे असा सल्ला दिला.

लोणी लगत असलेल्‍या ग्रामीण भागातुनही नागरीक व विद्यार्थी या बॅंकेत आर्थिक व्‍यवहार व कामांसाठी येत असतात.

ग्रामीण भागातुन रोजंदारी बुडवून महीला व नागरीक या बॅंकेत येतात तेव्‍हा बॅंकेत त्‍यांना ओरीजनल आधार कार्ड आणा, आधारकार्ड दाखविल्‍यावर त्‍याची दोन झेरॉक्‍स आणा, फोटो आणा त्‍यावेळी तो नागरीक बॅंकेच्‍या रांगेत उभा राहुन त्‍या आधिका-यापर्यंत गेलेला असतो तेव्‍हा हे सर्व सांगुन पुन्‍हा परत पाठविले जाते.

रोजंदारी बुडवून आलेल्‍या त्‍या माणसाचे काम काही त्‍या बॅंकेत होत नाही व बॅंकेचा वेळ संपला आहे आता उद्या या असा सल्‍ला संबधितांकडुन दिला जातो.

नागरीकांनी बॅंकेचा उच्च पदस्त आधिका-यांकडे अडचण मांडल्‍यास तुम्‍ही बॅंकेतुन खाते काडुन बंद करा अशी धमकीच देतात. आधिकारीच जर अशा प्रकारे जेष्ठ नागरीकांनी व आडाणी व्यक्तींनी वागत असतील तर मग नेमक कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न परिसरातील नागरीकांना पडला आहे.

Leave a Comment