Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

अहमदनगर : माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज रात्री निधन झाले

नोबेल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला,

त्यांचा अंत्यविधी  खारे खर्जुने येथे उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे.

१९९६ मध्ये वयाच्या ५५ व्या वर्षी दादापाटील शेळके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खासदार झाले होते. 

शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक पुत्र रावसाहेब व तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.

दादा पाटील शेळके यांचा जीवनपट 
– जन्म – 2 ऑगस्ट 1941
– शिक्षण – SSC
– चार वेळा आमदार (1978 ते 94)
– दोनदा खासदार (1994 व 1996)

दादा पाटील शेळके चार वेळा आमदार व दोन वेळा खासदार झाले. तसेच 1962 ते 1978 दरम्यान जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.

याबरोबरच नगर तालुका पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्र रोजगार हमी योजना समितीचे सदस्य, नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष, नगर तालुका दूध संघाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असे विविध पदे भुषविली होती.

 

 

 

 

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button